| आजकाल दहावी , बारावीच्या मुलांसाठी आयपॅड , मोबाईल , टू व्हीलर ,फेसबुक ह्या जीवनावश्यक गोष्टीं बरोबर 'क्लास' ही पण एक जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. मला नुकतीच एक "क्लास"टुर अनुभवायचा योग आला. माझ्या एका बदली होऊन आलेल्या साउथइंडीयन मैत्रीणी बरोबर, तिच्या नुकत्याच दहावीला गेलेल्या मुलीसाठी क्लासची चौकशी करायला तिच्या बरोबर गाईड म्हणून गेले होते. त्या टुर ची ही थोडी झलक. "आमच्या कडे चार कॅटॅगीरीस आहेत, सिल्व्हर्,गोल्ड्, डायमंड आणि प्लॅटीनम." क्षणभर मला चुकून गाडगीळांच्या दुकानात आल्या सारख वाटलं .काही विचारायला क्षणाची ही उसंत न देता पुढचे ऑप्शन्स आले. "सिल्वर मधे ३ युनिट टेस्ट आणि २ प्रिलीम त्याची फीस ५५००/- गोल्ड मधे ५ युनिट आणि ३ प्रिलीम्स त्याचे ८५००/- रुपये , डायमंड मधे अमक तमक , अमुक आणि तमुक मिळुन पॅकेज घेतल तर १०% डिस्काउंट , चार च पॅकेज घेतल तर १२% डिस्काउंट शिवाय,कुठेही अॅड्मिशन मिळेल एवढे मार्क्स मिळतील ह्याची हमी, ३ वर्कशॉप्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटस ची फ्री. शिवाय प्रोजेक्टस साठी ही मदतीची हमी". त्यांच्या फीचा आकडा ऐकुन, त्या फी मधे चारही क्याटॅगीरीतला निदान एकेक तरी दागिना आला असता असं आपल उगीचच वाटायला लागल. पालकांनी केलेला दहावीचा बागुलबुआ, क्लासेस नी बरोब्बर कॅश केला होता. आम्ही पुढच्या दुकानात निघालो. "तुम्ही फार उशीर केलात". कोणाला सांगतायत म्हणून आम्ही मागे वळून बघीतलं, तर ते आम्हालाच सांगत होते. नक्की कशाला उशीर झाला हे नकळून मी पटकन म्हणाले "उशीर ? अहो पण ती तर याच वर्षी दहावीला गेलीय". "आमच्या कडे दहावीसाठी च्या क्लासला , आठवी पासूनच मुल येतात. आमच तीन वर्षांच पॅकेज असतं. आता अॅडमिशन्स फुल झालेल्या असतात, त्यातून एखाद दुसरी कॅन्सल झाली तर कळवू. पण सातवी ला ८५% मार्क्स आवश्यक आहेत, तरच एन्ट्रन्स देता येइल". "कसली एन्ट्रन्स "? अगदी बावळट प्रश्ण विचारतोय हे कळत होतं तरी देखील मी विचारलच. उगीच शंकेला जागा नको. "अहो क्लास साठीची प्रवेश परिक्षा". बापरे म्हणजे क्लास मधे एन्ट्री मिळवायला आत्ता पासूनच मार्कांचा मेरु पर्वत पार करायचं होता . मैत्रीण हताश झाली. ह्या क्लासला प्रवेश मिळाला नाही तर शिक्षणाच्या सगळ्या वाटा आता खुंटणार असे काहीसे भाव होते मैत्रीणीच्या चेहेर्यावर. लेकीच्या डोळ्यात पाणी आलं होतं . आता शेवटच्या ठिकाणी एकदा बघूया क्लासची चौकशी करून. शिल्लक राहिलेला पेशन्स ट्राय करायला आमचा मोर्चा तिकडे वळवला.त्या बाईनी त्यांच्या दुकानाची माहिती सांगायला सुरवात केली. "आमचा क्लास सकाळी सहा वाजता सुरु होतो, तो अकरा ला संपतो.त्यामुळे मुलं फार पेल असली की झेपत नाही त्याना एवढं सगळं ". हे वाक्य तिने मैत्रीणीच्या मुलीच्या चेहेर्या कडे पाहून फेकलं होतं. आता क्लास झेपण्या साठी एखाद जीम बीम पण चालवल जात का काय अशी शंका आली. आता शाळा सुटल्यावर क्लास च्या शोधार्थ दिवसभर वणवण केल्यावर चेहेरा टवटवीत कसा दिसणार होता कुणास ठाउक ? मुलांना अभ्यास झेपेल की नाही हे चेहेर्यावरूनच ताडण्याची एक अद्भुत शक्ती प्राप्त असल्याचा अभिमान त्या बाईच्या वाक्यात आणि चेहेर्यावर होता. पुढची टेप परत विषयावर येऊन सुरु झाली. "२८ मार्च पासून क्लास सुरु होतो मे महिन्याचा पहिला आठवडा फक्त सुट्टी, जूनच्या पहिल्या आठवड्यात परिक्षा . मे एंड ला सगळा पोरशन संपवतो नंतर फक्त टेस्टस द्यायच्या. आत्ता अडमिशन झाल्यात. ४ नंबर आहेत वेटींगला , तुमचा पण नंबर लाऊन ठेवायचाय का ? त्यासाठी त्या साठी सातवीत ८० मार्क असणं गरजेच आहे. प्रोस्पेक्टस घ्या आणि २००० रुपये अॅड्व्हान्स भरा. नाही मिळाली अॅडमिशन तर अॅड्व्हान्स परत मिळेल". "आमचा निकाल १००% लागतो". आता इथे ही ८० % च्या पुढे मार्क मिळवणारी मुल घेतल्यावर १००% निकाल न लागला तरच नवल . "मुलांना चित्त एकाग्रतेसाठी, दहावीच्या परिक्षेच टेंन्शन येऊ नये म्हणून अमुक तमुक बाबांच योगा शिबीरही आम्ही ठेवतो, त्यात मेडीटेशन, प्राणायाम योगा , हे सगळं येतं / पण त्याचे ५०० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील". "शिवाय आम्ही पालकांसाठी पण एक वर्कशॉप घेतो. दहावीच्या काळात मुलांशी कस वागावं, कसा संवाद साधावा , त्यांच्या वेळा कशा पाळाव्यात हे सगळ मार्गदर्शन आम्ही पालकांना करतो. त्याचेही ५०० रुपये वेगळे भरावे लागतील". चला एका प्याकेज मधे बरेच पक्षी मारले जाणार होते . मैत्रिणीने प्रॉस्पेक्टस घेतलं आणि आगाऊ पैसे भरले. "अभिनंदन ! ९३.९६ टक्के मिळाले म्हणजे मस्तच ! आता कुठल्याही कॉलेजला अगदी सहज अॅडमिशन मिळेल". मुलीचा दहावीचा निकाल लागल्या लागल्या मैत्रीणीने फोन केला होता. छे गं , इतक कुठलं आलय आमच नशीब, दीड टक्का अजून मिळाला असता तर एफ सी ची अॅडमिशन पक्की होती आणि डोके क्लासचीही, नाही तर दहावीला फ्रेंच तरी घ्यायला हव होतं, बेस्ट ऑफ फाईव्ह......" मला पुढच काहीच ऐकु येइना. इतके मार्क मिळवूनही ही अवस्था ? "अगं ९३ म्हणजे कमी आहेत का" ? "नुसते ९३ नाही ९३.९६ अगदी पॉईट ला सुद्धा महत्व असतं हल्ली". मैत्रीणीला नुसते पॉईंट सुद्धा कमी झालेले नको होते. पॉईंट पॉईंट लढवून देखील समोर मोठ्ठ प्रश्ण चिन्ह होतच. "परत क्लासला अॅडमिशन मिळायला मार्कांची अट आहे" ? माझा अजून एक विसंगत प्रश्न "अगं जरा हल्लीच्या जगात डोकवून बघ काय चाललय" मी अगदीच मागच्या शतकात वावरतेय अस समजून मैत्रीण म्हणाली. "परवाच एका क्लासची चौकशी करून आले अकरावी, बारावी, सी ई टी अस प्याकेज आहे.साधारण एक लाख रुपयांपर्यंत . पण त्या शिवाय काय आहे ? ९० च्या वर मार्क मिळवायचे तर आपल्या कडून काही कमी पडायला नको. इंजीनियरींगला अॅडमिशन हवी तर मार्कांशिवाय पर्याय नाही" "अग पण तिला विचारलस का" ? मागे एकदा कधीतरी , जर्मन, संस्कृत भाषा पुढे शिकणार आहे अस काही तरी तिची लेक म्हंटल्याच आठवतं होतं. "तिला काय कळतय "? मैत्रीणीने तिच्या लेकी साठी काही करायच शिल्लक ठेवल नव्हतं. अगदी विचार सुद्धा. "चल जरा माझ्या बरोबर तुझीही लेक दोन वर्षात येइल दहावीला, त्यासाठी हे ट्रेलर बघायला मिळेल तुला". बापरे हे ट्रेलर ? म्हणजे पिक्चर अभी भी बाकी है ? मागच्या वेळच्या ट्रेलरचा धसका घेतल्याने पुन्हा तिच्या बरोबर जायची माझी हिंमत झाली नाही. |
Saturday, July 20, 2013
क्लास साठी दाही दिशा (दशा ?)
सुट्टी
आई ग आज तु ऑफिसला मार ना ग बुट्टी
माझ्या साठी एकदिवस तरी काढ की ग सुट्टी
मस्त पैकी दोघी जणी नाटकाला जाऊ
येता येता गारेगार आईस्क्रिम खाऊन येऊ
मग आपण दोघीजणी खेळु भातुकली
मी होईन आई आणि तु हो माझी छकुली
मी ही मग तुला एकट ठेऊन ऑफिस मधे जाईन
येताना मात्र तुझ्यासाठी खाऊ घेऊन येईन
दुपारी मग मस्त पैकी कुशीत तुझ्या झोपेन
तुझी जुळवलेली गोष्ट पण मन लाऊन ऐकेन
सारखा तुझा पी सी आणि सारख्या तुझ्या मिटींगा
एक दिवस विसर सगळ ,घालु मस्त दंगा
प्रॉमिस !, तुला पुन्हा असा हट्ट करणार नाही
पुन्हा ऑफिस ला बुट्टी मारायला लावणार नाही
मग आई एकदिवस मारतेयस ना ग बुट्टी?
मस्त मजेत जाईल बघ मग माझी सगळी सुट्टी.
माझ्या साठी एकदिवस तरी काढ की ग सुट्टी
मस्त पैकी दोघी जणी नाटकाला जाऊ
येता येता गारेगार आईस्क्रिम खाऊन येऊ
मग आपण दोघीजणी खेळु भातुकली
मी होईन आई आणि तु हो माझी छकुली
मी ही मग तुला एकट ठेऊन ऑफिस मधे जाईन
येताना मात्र तुझ्यासाठी खाऊ घेऊन येईन
दुपारी मग मस्त पैकी कुशीत तुझ्या झोपेन
तुझी जुळवलेली गोष्ट पण मन लाऊन ऐकेन
सारखा तुझा पी सी आणि सारख्या तुझ्या मिटींगा
एक दिवस विसर सगळ ,घालु मस्त दंगा
प्रॉमिस !, तुला पुन्हा असा हट्ट करणार नाही
पुन्हा ऑफिस ला बुट्टी मारायला लावणार नाही
मग आई एकदिवस मारतेयस ना ग बुट्टी?
मस्त मजेत जाईल बघ मग माझी सगळी सुट्टी.
Subscribe to:
Comments (Atom)